निर्भीडसत्ता न्यूज –
महापालिकेच्या माध्यमिक शाळांमधील किशोरवयीन मुला-मूलींमध्ये रक्तक्षय आढळतो, त्यामुळे 10 ते 19 वर्ष वयोगटातील किशोरवयीन मुला-मुलींच्या रक्तक्षय व पोषणाबाबत काळजी घेतली जाणार आहे. याकरिता आयर्न फॉलिक असिड सप्लिमेंटेशन योजना राबविण्यात येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी दिली.
पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या चाणक्य हॉलमध्ये आज (शनिवारी) माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, प्रभारी वैद्यकीय अधिकारी आणि पी.एच.एन. यांचेकरिता एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
शिक्षण मंडळाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी पराग मुंढे, जिल्हा प्रशिक्षण केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.टी.जी.कुलकर्णी उपस्थित होते.
डॉ. पावन साळवे म्हणाले की, किशोरवयीन मुला-मुलींच्या रक्तक्षय व पोषणाबाबत काळजी घेतल्यास त्याचा उपयोग माता मृत्यू, अर्भक मृत्यू, बालमृत्यू, कमी वजनांच्या बालकाचे प्रमाण कमी होईल, त्यानूसार महापालिकेच्या माध्यमिक शाळांमधील मुलां-मुलींना आयर्न फॉलिक ऍसिडच्या गोळ्या वाटप करण्याची मोहीम हाती घेतली आहे. जानेवारी 2018 मध्ये सर्व शाळांमध्ये त्या गोळ्यांचे वाटप करण्यात येणार असून रक्तक्षयाबाबत उपस्थितीत प्रशिक्षणार्थींना त्यांनी माहिती दिली. या प्रशिक्षणास माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, प्रभारी वैद्यकीय अधिकारी रुग्णालय, पी.एच.एन, जिल्हा अर्श समन्वयक व स्नेहा फाउंडेशनचे कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महिला वैद्यकीय अधिकारी डॉ.वर्षा डांगे यांनी केले.