निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड महापालिका सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या तसेच स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या एकूण 17 अधिकारी व कर्मचा-यांचा महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते शाल, स्मृतिचिन्ह देवून सन्मान करण्यात आला.
या वेळी स्थायी समिती सभागृहात झालेल्या कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त चंद्रकांत इंदलकर, समाजविकास अधिकारी संभाजी ऐवले, कामगार कल्याण अधिकारी विजय साबळे, कर्मचारी महासंघाचे भगवान मोरे, माहिती व जनसंपर्कचे किशोर केदारी उपस्थित होते.