निर्भीडसत्ता न्यूज –
निगडी ते दापोडी मार्गावर महापालिकेने बीआरटी बससेवा सुरू करणे नागरिकांसाठी धोकादायक आहे. त्यासाठी निगडी ते दापोडी बीआरटीला आपला विरोध असून ही बीआरटी रद्द करावी, अशी भूमिका महापालिका स्थायी समिती सभापती सिमा सावळे यांनी मांडली आहे. त्यांनी बीआरटी रद्द करून शासनाला निधी परत करावा लागल्यास तसेही पालिकेने करावे, अशा सूचना स्थायी समितीच्या बैठकीत आयुक्तांना केल्या आहेत.

स्थायी समिती समिती बैठकीच्या सिमा सावळे अध्यक्षस्थानी होत्या. स्थायी समितीच्या बैठकीत सभापती सिमा सावळे व सदस्या आशा शेंडगे यांनी महापालिका प्रशासनाला जाब विचारला. विरोधी नगरसेवक असताना देखील नागरिकांच्या सुरक्षेसाठी या बीआरटीला आपण सर्वप्रथम विरोध केला होता. पुणे-मुंबई रस्ता बघता ही बीआरटी बससेवा असुरक्षित आहे.
त्याबाबत हरकती घेतल्यामुळे बीआरटी चाचणी घेण्यापूर्वी पालिका प्रशासनाने माहिती देणे गरजेचे आहे. मात्र, प्रशासनाकडून परस्पर चाचणी घेण्यात आली आहे. महापालिका प्रशासनाने चुकीच्या पध्दतीने बीआरटी सुरू केली, तर त्याला आमचा विरोध राहील. बीआरटी सुरू न करता चुकीच्या पध्दतीने अंमलबजावणी करणा-या संबधितांची जबाबादारी निश्चित केली जावी. या बीआरटीसाठी शासनाने दिलेला निधी परत करावा लागणार आहे. तो परत करावा लागला, तरी या मार्गावर बीआरटी करू न देण्याची आपली भूमिका सावळे यांनी मांडली आहे.