शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे ३८ कोटी ६५ लाख ६५ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. स्थायी समिती सभागृहात आज झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी सीमा सावळे होत्या.
काळेवाडी फाटा ते देहू आळंदी या बीआरटीएस कॉरीडॉर गॅंट्री करणेकामी येणा-या सुमारे १ कोटी ६६ लाख १४ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. कासारवाडी फेज १ करीताचे मैलापाणी पंप हाऊस काळेवाडी व पिंपळे सौदागर पंप हाऊसचे वार्षीक चालन देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी येणा-या सुमारे १ कोटी ४८ लाख ९३ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. चिंचवड एस.बी.आर. मैलाशुद्धीकरण केंद्राअंतर्गत येणा-या मैला पंप हाऊसेसचे चालन देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी (गोखले पार्क, काकडे पार्क, केशवनगर, देऊळमळा) येणा-या सुमारे २ कोटी ३५ लाख ९३ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. के.एस.बी.चौक ते चिंचवड स्टेशन या रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी येणा-या सुमारे १ कोटी ९४ लाख १३ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.