निर्भीड न्यूज –
श्री मुनिसुव्रत स्वामी श्वेतांबर जैन संघ निगडी यांनी पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात फळ वाटप केले. श्री भगवान महावीर जयंतीनिमित्त फळ वाटप करण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष केतूल सोनिगरा, सुरेश गुगलिया, राजू राठोड, राजू चोपडा, महेंद्र पालरेचा, विकास मेहता, गौतम शेमलानी, आमित श्रीश्रीमाळ, संजय पारेख आणि मुकेश पालरेचा आदी या वेळी उपस्थित होते.