निर्भीड न्यूज –
रहाटणी गावातील सिध्दांत प्रतिष्ठान आणि विशाल भालेराव मित्र परिवारातर्फे भारतीय संविधान पुस्तकाचे वाटप करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी अर्थात 125 व्या जयंतीनिमित्त रहाटणी गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीचे सदस्य नगरसेवक कैलास थोपटे, नगरसेविका विमल जगताप, पुणे येथील नगरसेवक प्रदीप गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक अभिजित जाधव, माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते, पै. नीलेश नखाते, बाळासाहेब कापसे, राजेंद्र बारशिंगे, गुलचंद गायकवाड, तुषार सूर्यवंशी, तेजपाल कांबळे, महादेव कांबळे, सोमनाथ माने, प्रमोद सूर्यवंशी आदी या वेळी उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रांगोळी, निबंध, वकृत्व आणि संगीत खूर्ची स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यातील विजेत्यांनाही या वेळी बक्षिस वितरण करण्यात आले. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान’ या विषयावर व्याख्यान या वेळी झाले. भीमगीतांचा कार्यक्रमही या वेळी झाला. या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला.
राजू भालेराव यांनी सूत्रसंचालन केले. विशाल भालेराव यांनी आभार मानले.