निर्भीडसत्ता न्यूज
मुंबई- 25 जानेवारीला जगभरात सगळीकडे पद्मावत हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. परंतु, वादामुळे देशातील काही राज्यात हा सिनेमा प्रदर्शित होऊ शकला नसला, तरी विदेशात या सिनेमाला चांगली पसंती मिळत असल्याचे समोर आले आहे.
संजय लीला भन्साळींनी 190 करोड रुपये खर्च करून पद्मावत हा सिनेमा तयार केला आहे. फक्त हिंदीतच नाही, तर तेलगु आणि तामिलमध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. पद्मावत हा सिनेमा अगदी सुरूवातीपासून वादाच्या भोव-यात अडकला आहे. पद्मावत हा सिनेमा अजूनही अनेक राज्यात प्रदर्शित झालेला नाही. देशात जरी या सिनेमाला विरोध होत असला तरीही परदेशात या सिनेमाला चांगली पसंती मिळाली आहे. इतका विरोध झाल्यानंतरही पद्मावत या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर भरपूर पसंती मिळाली आहे.
या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई केली आहे. लाँग विकेंड या सिनेमाचा प्लस पॉईंट ठरला आहे. ऑस्ट्रेलियात या सिनेमाने 1.88 करोड रुपये कमाई केली आहे. तर न्यूझीलँडमध्ये 29.99 लाख रुपये आणि यूकेमध्ये 88.08 लाख रुपये कमाई या चित्रपटान केलेली आहे. त्यामुळे देशात विरोधाचा सामना करत असलेल्या पद्मावतला विदेशात लोकांनी डोक्यावर घेतल्याचे पाहायला मिळत आहे