निर्भीड न्यूज –
नगरसेवक शत्रुघ्न ऊर्फ बापू काटे यांचा वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांतर्गत श्री भैरवनाथ उत्सव कमिटी आणि रहाटणी ग्रामस्थांच्या वतीने रहाटणी येथे शुक्रवार, दि. 22 एप्रिल रोजी वृक्षरोपण करण्यात आले.
माजी सरपंच गोविंदराव तांबे, वस्ताद चांगदेव नखाते, शिवराम नखाते, गोविंदराव नखाते, गणपत नखाते, बळीतात्या नखाते, दगडू नखाते, हभप विश्वनाथ नखाते, अशोक नखाते, काशीनाथ नखाते, मोरेश्वर नखाते, दिलीप नखाते, लक्ष्मण पांचाल, प्रकाश नखाते, विनोद नखाते, रमेश नखाते, वसंत नखाते, हनुमंत नखाते, पोपट नखाते, विजय नखाते, मोहन भालेराव, निखिल नखाते, कार्यक्रमाचे संयोजक उत्सव कमिटीचे अध्यक्ष देवा नखाते आणि ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.
बेल आणि सौंदड या वृक्षाचे रोपण या वेळी करण्यात आले. भैरवनाथ मंदिर परिसरात हे वृक्षरोपण करण्यात आले.