आजचा वाढदिवस – प्रमोद अरगडे (रहाटणी)
निर्भीडसत्ता न्यूज | शुक्रवार, २ फेब्रुवारी 2018
रहाटणीतील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद अरगडे हे चिंचवड येथील पंचम मराठा वधु-वर सूचक मंडळाचे कार्याध्यक्ष आणि पि. चि. ट्रान्स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. यांचा आज वाढदिवस आहे. सामाजिक कामाचा वसा घेतल्यामुळे घरात कायम सामाजिक-राजकीय व्यक्तींची ये-जा असते. गेली अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात कार्यरत आहेत. सामाजिक, शेक्षणिक, धार्मिक अशा विविध क्षेत्रात त्यांनी उपक्रम राबिवले आहेत, कामगार नेते यशवंत भोसले यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काम हि केले आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड व रहाटणी परिसरातील सर्व स्तरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.