निर्भीडसत्ता न्यूज –
निगडी येथील नोव्हेल संस्थेच्या एनआयबीआर हॉटेल मॅनेजमेंटमध्ये आगळं वेगळं प्रदर्शन भरले आहे. विविध नाविन्यपूर्ण युक्तींचा वापर करुन हे प्रदर्शन भरले आहे.
प्रदर्शनाचे उद्घाटन नॉव्हेलचे संस्थापक अध्यक्ष अमित गोरखे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्य वैभव फंड, विद्यार्थी आदी उपस्थित होते.
याबाबतची महिती देताना प्रोफेसर सुखदा कुलकर्णी म्हणाल्या, हॉटेल मॅनेजमेंट या विषयामध्ये विद्यार्थ्यांना आवड निर्माण व्हावी. त्यात गोडी लागावी या उद्देशाने हे प्रदर्शन भरविले आहे. हॉटेल मॅनेजमेंटच्या हाऊस किपिंग या विषयांतर्गत हॉटेल्सचे इंटेरिअर डेकोरेशन कसे असेल हा विषय घेऊन यंदाचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. हे प्रदर्शन तिस-या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी भरविले असून या प्रदर्शनात जेल हॉटेल, टॉयलेट हॉटेल्स, गुहेतील हॉटेल, जंगल, एरोप्लेन, चंद्रावरचं हॉटेल्स कशी असणार आहे याबाबतच आगळं वेगळं प्रदर्शन भरले आहे. यंदाचे हे प्रदर्शन भरविण्याचे दहावे वर्ष आहे. २००८ चे प्रदर्शन हे निर्मिती क्रिएशनच्या अंतर्गत भरविण्यात आले होते.
भविष्यात हॉटेल्स कशी असणार आहेत याचे एक उत्तम उदाहरण या विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाच्या माध्यमातून दिले आहे. गेल्या पंधरादिवसांपासून विद्यार्थ्यांनी स्वतःचे कौशल्य वापरुन व विविध युक्ती वापरुन भविष्यातील हॉटेल्स ही कशी असतील यावर व्हिअर्ड अशी थीम वापरली आहे.
याबाबत बोलताना नॉव्हेल इन्स्टियूटचे संस्थापक अध्यक्ष अमित गोरखे म्हणाले, शहराचा औद्योगिक विकास झपाट्याने होत असल्याने येथे त्रितारांकित व पंचतारांकित टोलेजंग हॉटेल्स उभी राहत आहेत. हॉटेल व्यवसायाला इंडस्ट्रीजचे स्वरुप प्राप्त झाले आहे. हॉटेल मॅनेजमेंट हा प्रमुख व्यवसाय म्हणून नावारुपाला आला आहे. हॉटेल मॅनेजमेंटमध्ये अन्नाचा दर्जा, हाऊस किपिंग, सजावट अशा विविध जबाबदा-यांचा समावेश असतो. पुढील भविष्यात असेच विविध प्रकारचे हॉटेल्स निघतील यात शंका नाही. ती हॉटेल्स कशी असतील हेच हॉटेल्स प्रदर्शनातून मांडण्यात आले आहे.