निर्भीडसत्ता न्यूज –
शिर्डी येथे झालेल्या सब ज्युनियर व ज्युनियर राज्यस्तरीय लगोरी स्पर्ध्येत पिंपरी चिंचवडच्या लगोरी संघाने द्वितीय क्रमांक मिळविला. शाळेचे संस्थापक जगन्नाथ काटे, मुख्याध्यापिका दीपाली जुगुळकर, साने अनिता, पर्यवेक्षक संगीता पराळे, सर्व शिक्षक , विद्यार्थी यांनी तसेच पिंपरी चिंचवडचे लगोरी सचिव राजू गोसावी, नंदू सर यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले.
जुनियर या गटामध्ये पी के स्कूलचा संपूर्ण संघ सहभागी झाला होता व सब जुनियर या गटामध्ये सुद्धा पी के स्कूलचा संघ सहभागी झाला होता या दोन्ही संघानी द्वितीय क्रमांक मिळवून राज्यामध्ये पिंपरी चिंचवडचे नाव या खेळात उंचावले आहे. विजयी संघाकडून सौरभ डांगे, कश्यप जोशी, गौरव भालेकर, प्रज्वल वाघमारे, देवेश महाडिक, केतन सोनवणे, मधुर शिंदे या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. या राज्यस्तरीय स्पर्धेत एकूण 20 जिल्हे सामील झाले होते. सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक राहुल कोरे व सैनाजी शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.