निर्भीडसत्ता न्यूज –
बॉलीवुडमधील मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे काही दिवसांपूर्वी एका बिकीनीवरील फोटो शेअर केल्याने तिला ट्रोलर्सचा सामना करावा लागला होता. या फोटोत राधिका आपल्या मित्रासोबत बीचवर बिकीनीमध्ये मौजमस्ती करताना दिसते. या फोटोवर यूजर्सने राधिकाच्या ड्रेसवर आक्षेप घेतला होता. याला राधिकाने सडेसोड उत्तर दिले आहे.
गेल्या आठवड्यात गोव्याच्या एका बीचवरील रिलॅक्स करतानाचा एक फोटो राधिकाने पोस्ट केला होता. या फोटोमध्ये राधिका बिकीनी घालून एका मित्रासोबत वाईन घेताना दिसत आहे. सोशल मीडियावर अशा प्रकारचा बोल्ड फोटो टाकल्याबद्दल तिला ट्रोल करण्यात आले. ट्रोल केले जात आहे हे मला माहितही नव्हते. हे खरोखरच हास्यास्पद असून मी बीचवर साडी नेसावी अशी लोकांची अपेक्षा आहे का?