निर्भीडसत्ता न्यूज –
राष्ट्रवादी कांग्रेस गटनेतेपदी नियुक्ती झाल्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी दत्ता साने यांची निवड करण्यात आली आहे. विभागीय आयुक्तांच्या पत्रानुसार महापौर नितीन काळजे यांनी दत्ता साने यांना नियुक्तीपत्र दिले.
यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, राजू मिसाळ, जावेद शेख, वैशाली काळभोर, विनया तापकीर, सुलक्षणा धर आदी उपस्थित होते.