निर्भीडसत्ता न्यूज –
शहीद हेमू कलानी यांचा देशाच्या स्वतंत्र्यासाठी मोठा त्याग असून त्यांच्या पुतळ्यामुळे सर्वांना स्फूर्ती मिळेल, असे मत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरिश बापट यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आज प्रभाग क्र. २१, पिंपरी मधील शहीद हेमू कलानी अर्धपुतळ्याच्या चौथा-याचे भुमिपूजन व उद्यान सुशोभिकरण कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, शहर सुधारणा समिती सभापती सिमा चौगुले, ग प्रभाग अध्यक्ष बाबासाहेब त्रिभुवन, नगरसदस्य संदीप वाघेरे, डब्बु आसवानी, नगरसदस्या निकीता कदम, उषा वाघेरे, स्विकृत सदस्य मोरेश्वर शेडगे, माजी नगरसदस्या ज्योतिका मलकानी, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता संजय कांबळे, उद्यान अधिक्षक दत्तात्रय गायकवाड, अमोल थोरात, सिंधु सेवा संगम संस्थेचे कमल मलकानी, श्रीचंद संगदील, शिव इदनानी, अशोक पुनजाबी, हिरो आहुजा, मधु सबनानी, जवाहर कोटवानी तसेच संतोष कुदळे आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री गिरिष बापट म्हणाले, हेमू कलानी यांचे चरित्र आपण वाचले पाहिजे. हेमू कलानी यांचा कैदेत असताना अतोनात छळ झाला. तरी सुद्धा त्यांनी आपल्या सहका-याची नावे इंग्रजांना सांगितली नाही. हेच खरे त्यांचे राष्ट्रप्रेम आहे. हेमू कलानी यांचा देश सेवेसाठी फार मोठा त्याग आहे. या उद्यानाचे व पुतळ्याचे काम उत्तम दर्जाचे व लवकर पुर्ण करावे असेही ते म्हणाले.
याप्रसंगी आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, अखंड भारत वर्षातील शहीद हेमू कलानी हे आदर्श स्वातंत्र्य सेनानी होते. शहीद हेमू कलानी यांचा पुतळा उभारण्यासाठी ज्यांनी या कामासाठी पाठपुरावा केला. त्यांचेही मनापासून आभार मानले पाहिजेत असेही ते म्हणाले.
पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, शहीद हेमू कलानी यांनी स्वतंत्र भारतासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पीत केले. शहीद हेमू कलानी यांची ओळख व त्यांच्या कार्याची माहिती शहरवासियांना व्हावी म्हणून आज हा भूमिपूजनाचा कार्यक्रम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून आयोजित केला आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसदस्य संदिप वाघेरे यांनी केले, सुत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले यांनी केले. तर आभार ज्येष्ठ नागरिक संघाचे दादा पमनाणी यांनी मानले.