निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपने वर्षभरात राष्ट्रवादीने केलेल्या विकास कामांची उद्घाटने करुन स्वताःचा टेंभा मिरवला आहे. प्रत्यक्षात गेल्या वर्षभरात एकही महत्वपुर्ण प्रकल्प भाजपने राबविलेला नाही. त्यामुळे त्यांनी विकास कामे करण्याएेवजी विविध कामांत काळेबेरे करुन करदात्यांच्या पैशांची लूट करीत स्वतःची घरे भरली आहेत. शहरात कचरा, पाणी प्रश्नांवरुन नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. तर उर्वरीत गोरगरींबाना घरे देण्याएेवजी त्यांना वंचित ठेवून जागा ताब्यात नसताना पंतप्रधान आवास योजना राबवू लागले आहेत. त्याच्या सगळा भांडाफोड पुराव्यानिशी करणार आहे, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी पत्रकार परिषदेत केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, महिला शहराध्यक्षा व नगरसेविका वैशाली काळभोर, नगरसेवक डब्बू आसवानी, समीर मासूळकर, राहूल भोसले, नगरसेविका वैशाली घोडेकर, विनया तापकीर, सुमन पवळे आदी उपस्थित होते.
अन राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षात अजूनही गटबाजी
महापालिकेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी इच्छुक असलेले नाना काटे, माजी आमदार विलास लांडे, माजी विरोधी पक्षनेते योगेश बहल, नगरसेविका मंगला कदम यांच्या शहरातील पहिल्या फळीचे नेतेमंडळी दत्ता साने यांच्या पत्रकार परिषदेला गैरहजर…
पालिकेतील भ्रष्टाचारात आयुक्तांचा सहभाग
आयुक्त श्रावण हर्डीकर भाजपचे प्रवक्ते आहेत, त्यांचाही भ्रष्टाचारात सामील आहेत, त्यांनी मागील काळात भाजप पदाधिका-यांना पैसा मिळवून देण्याचे काम केले. आयुक्तच भ्रष्टाचाराला पाठिशी घालत असल्याने वेळ प्रसंगी त्यांच्या बदलीचीही मागणी आम्ही करणार आहोत.