निर्भीडसत्ता न्यूज –
सनी लिओनीच्या आगामी साऊथ इंडियन ‘वीरमादेवी’ सिनेमाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. सनीने स्वत: तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. या सिनेमात सनी तुम्ही कधीही न पाहिलेल्या रुपात दिसणार आहे. या सिनेमाच्या पोस्टरमध्ये सनी एका राणीच्या रुपात दिसत आहे. ती घोडेस्वारी करत युद्धाला जात आहे. या सिनेमात साकारत असलेली भूमिका सनी पहिल्यांदाच साकारणार आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांसाठी हा सिनेमा वेगळा अनुभव देणारा ठरणार आहे.
तमिळ आणि तेलगु भाषेत तयार होत असलेला हा सिनेमा मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषेत रिजीज होणार आहे.