निर्भीडसत्ता न्यूज –
दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज क्रिकेटर एबी डिविलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे. एबी डे विलियर्सने आतापर्यंत ११४ कसोटी, २२८ वनडे आणि ७८ टी-२० सामन्यात आफ्रिकेचे प्रतिनिधित्व केलेय. ३४ वर्षीय क्रिकेटर डेविलियर्सच्या मते रिटायर होण्याची हीच योग्य वेळ असल्याने त्याने हा निर्णय घेतलाय.
मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तीनही फॉरमॅटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतलाय. ११४ कसोटी, २२८ वनडे आणि ७८ टी-२० सामने खेळल्यानंतर मी निवृत्त होतोय. आता इतरांनी ही जागा घेण्याची गरज आहे. माझा टर्न संपला आणि खरे सांगायचे तर मी थकलो. हा निर्णय कठीण होता. खूप वेळ मी याबाबत विचार केला त्यानंतर हा निर्णय घेतला. चांगले क्रिकेट खेळत असताना निवृत्ती घेणे योग्य आहे, असे डेविलियर्सने म्हटले आहे.