निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयासाठी 14 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्याबाबतचे आदेश आज (दि.25) रोजी करण्यात आले आहेत. येत्या 15 ऑगस्ट पासुन आयुक्तालय सुरू करण्याची तयारी आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात बदली करण्यात आलेल्या पोलिस निरीक्षकांची नावे आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली आहे हे लिहीले आहे.
यशवंत नामदेव गवारी (कोल्हापूर ते पिंपरी-चिंचवड आयुक्तालय), राजेंद्र जयंत निकाळजे (मुंबई शहर ते पिंपरी-चिंचवड आयुक्तालय), भानुदास आण्णासाहेब जाधव (मुंबई शहर ते पिंपरी-चिंचवड आयुक्तालय), दिलीप तुकाराम भोसले (मुंबई शहर ते पिंपरी-चिंचवड आयुक्तालय), सुनिल रंभाजी दहिफळे (मुंबई शहर ते पिंपरी-चिंचवड आयुक्तालय), संजय वामनराव निकम (पुणे शहर ते पिंपरी-चिंचवड आयुक्तालय), पांडूरंग बाबासाहेब गोफणे (रायगड ते पिंपरी-चिंचवड आयुक्तालय), सतिश विठ्ठल पवार (कोल्हापूर ते पिंपरी-चिंचवड आयुक्तालय), सुनिल विष्णू पवार (अहमदनगर ते पिंपरी-चिंचवड आयुक्तालय), सुधाकर पंडीराव काटे (सीआयडी ते पिंपरी-चिंचवड आयुक्तालय), श्रीराम बळीराम पौड (राज्य गुप्तवार्ता विभाग ते पिंपरी-चिंचवड आयुक्तालय), अजय विनायकराव जोगदंड (पोप्रकें नानवीज, दौंड ते पिंपरी-चिंचवड आयुक्तालय), टि.वाय. मुजावर (सीआयडी ते पिंपरी-चिंचवड आयुक्तालय) आणि प्रदीप उत्तम लोंढे (मुंबई शहर ते पिंपरी-चिंचवड आयुक्तालय).