निर्भीडसत्ता न्यूज –
वाकड, ताथवडे, पुनावळे या प्रभाग क्रमांक 25 मधील सहा विकास कामांचे महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. 18 महिन्यांत ही कामे पूर्ण होणार असून यासाठी 26 कोटी रुपये खर्च आहे.
रस्त्यांचे रुंदीकरण, डांबरीकरणास सुरुवात झाली. यामध्ये वाकड, काळा खडक सर्व्हे नं. 125 पासून वाकड पोलीस ठाण्यापर्यंतचा 24 मीटर रस्ता, पुनावळे येथील चार ठिकाणचा 18 मीटर डीपी रस्ता आहे. अमृत योजनेतून पुनावळे येथे अडीच एकरमध्ये उद्यान विकसित करणार आहे.
शिवसेनेचे संपर्क प्रमुख बाळा कदम, गटनेते नगरसेवक राहुल कलाटे, स्थायी समिती सदस्य अमित गावडे, नगरसेवक मयुर कलाटे, नगरसेविका अश्विनी वाघमारे, रेखा दर्शीले, निवृत्ती भुजबळ, अतुल ढवळे, सुरेश रानवडे, महापालिका अधिकारी देवआण्णा गट्टेवार, प्रमोद ओंबासे, संजय कांबळे व नागरीक यावेळी उपस्थित होते.