निर्भीडसत्ता न्यूज –
महागाई व बेरोजगारीमुळे सर्व सामान्य नागरीकांचे कंबरडे मोडले असताना केंद्र व राज्य सरकारने ही पेट्रोल व डिजेल दरवाढ केलेली आहे. असे असताना अंध मोदी भक्त निर्लज्जपणे समर्थन करताना दिसतात यांना जनाची नाही मनाची लाज देखील वाटत नाही. पेट्रोल, डिझेल दरवाढ म्हणजे भाजपची संघटीत सरकारी लुट असल्याचे सांगत सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी सरकारचा निषेध केला आहे.
भारतीय जनता पक्षाने लोकसभा विधानसभा निवडणुकीत महागाई भ्रष्टाचाराचे मुख्य मुद्दे उपस्थित करून, अच्छे दिनाचे वादे करून, बहुत हुई महंगाईकि मार, आपकी बार भाजप सरकार! अशा लोभस घोषणा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्टीय अध्यक्ष अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह सर्व नेत्यांनी नाना प्रकारच्या आश्वासनांची बरसात केली. त्याला जनतेने भुलून सत्तेसाठीचे धो धो बहुमत भाजपला दिले मोदी सरकारच्या गेल्या चार वर्षाच्या काळात “त्या” बाता एकेक करीत “थापा” असल्याच उघडकीस येत आहे.
पौर्णिमेच्या चंद्राच्या कलेकलेने पेट्रोल व डिझेल दरवाढ मागील आठ दिवसांपासून वाढवली जात आहे. त्यामुळे सर्व सामान्य जनता त्रस्त आहे. सप्टेंबर २०१३ मध्ये अंतरराष्टीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रतीबॅरल १०९.४५ डॉलर अशी होती. त्यावेळी पेट्रोलचे दर प्रती लिटर दिल्लीमध्ये ७६ र.रु ०६ पैसे, कोलकत्ता येथे ८३ रु.र ६३ पैसे आणि मुंबई पुणे ८३ र.रु ६२ पैसे असे एक लिटर पेट्रोलचे भाव होते. व त्यावेळी त्यावेळच्या सरकार विरोधात भाजपचे सर्व नेते कार्यकर्त्यांनी आकाश पातळ एक करून थयथयाट केला होता. ऑक्टोंबर २०१७ रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्या तेलाची किमंत प्रतीबॅरल ५५ डॉलर अशी असताना दिल्लीमध्ये ७१ रु.रु कोलकत्यामध्ये ७३ रु.रु आणि मुंबई पुणे ८० रु.रु असा पेट्रोलचा एक लिटरचा भाव होता. गेल्या आठ दिवसांत पेट्रोलचे (लिटरला) ८ रुपयाने दरवाढ झाली आहे. त्यामुळे पेट्रोल प्र.ली. र.रु ८५.५१ आणि डिजेल प्र.ली.र.रु ७२ असे दर आहेत. खरे तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्या तेलाची वारंवार कमी झालेले दर पहाता आज पेट्रोल ४० रुपय लिटरने ग्राहकांना मिळायला हवे, असेही भापकर यांनी म्हटले आहे.