निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे 5 कोटी 21 लाख 45 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. स्थायी समिती बैठकीच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या.
प्रभाग क्र. 31 मॅगजीन चौक उद्यान विकसीत करण्यासाठी येणा-या सुमारे 27 लाख 17 हजार रुपयांच्या खर्चास, प्रभाग क्र. 12 मधील से.क्र. 22 ओटा स्किमच्या विकसीत झालेल्या इमारतीच्या परिसरात पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी व देखभालीची कामे करण्यासाठी येणा-या सुमारे 30 लाख 96 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र. 44 मधील हेमू कलानी उद्यानात शहीद हेमू कलानी यांचा पुतळा उभारण्यासाठी येणा-या सुमारे 25 लाख 89 हजार रुपयांच्या खर्चास, ‘ग’ प्रभागातील जलनीःसारण नलिकांची वार्षिक ठेकेदारी पध्दतीने साफसफाई करणे व चोकअप काढण्यासाठी येणा-या सुमारे 46 लाख 74 हजार रुपयांच्या खर्चास, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेस जे.एन.एन.यू.आर.एम अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन साठी शासनाकडील मंजूर निधीमधून यांत्रिक पध्दतीने रस्ते सफाई करण्यासाठी येणा-या सुमारे 1 कोटी 40 लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.
मनपाचे विद्युत विभागासाठी आवश्यक विविध एसी, वॉटर कुलर्स आणि फॅन्स साहित्य खरेदीकामी येणा-या सुमारे 25 लाख 87 हजार रुपयांच्या खर्चास, 26 जानेवारी 2018 रोजी भक्ती-शक्ती चौक निगडी येथे उदघाटनसाठी बिस्किट व पाणी बॉटल खरेदी करण्यासाठी येणा-या सुमारे 27 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. पिंपरी-चिंचवड मनपाच्या माध्यमिक विद्यालयासांठी सन 2018- 19 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 5 वी ते 8 वी व 9 वी ते 10 वीच्या मराठी, इग्रंजी. उर्दु माध्यमासाठी क्रमिक पुस्तके खरेदी करण्यासाठी येणा-या सुमारे 21 लाख 80 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.
पिंपरी-चिंचवड मनपाच्या माध्यमिक शिक्षण विभागांतर्गत असलेल्या 18 माध्यमिक विद्यालयातील व औद्योगिक प्रशिक्षण केंद्र मुलांचे मोरवाडी, मुलींचे कासरवाडी मधील विद्यार्थ्यांना बिस्किट व पाणी बॉटल खरेदी करण्यासाठी येणा-या सुमारे 82 हजार रुपयांच्या खर्चास, जिल्हास्तर शालेय हॉकी स्पर्धा 2018-19 अनुषंगाने 250 विद्यार्थी खेळाडूंचे मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडीयम नेहरूनगर, पिंपरी येथे उन्हाळी हॉकी प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यासाठी येणा-या सुमारे सहा लाख 56 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.
मनपाच्या विद्युत मुख्य कार्यालयाकडील एल.ई.डी. दिये बसविणेकामी येणा-या सुमारे 29 लाख 95 हजार रुपयांच्या खर्चास, मनपाच्या स्थापत्य विभागाकडील क्रांतीवीर चापेकर वाड्याच्या तिस-या टप्प्याची कामे करण्यासाठी येणा-या सुमारे 43 लाख 14 हजार रुपयांच्या खर्चास, मनपाच्या स्थापत्य विभागाकडील प्रभाग क्र. 18 मध्ये ताब्यात येणारे आरक्षणे विकसीत करण्यासाठी येणा-या सुमारे 20 लाख 31 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेतून अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त होत असतात. या अधिकारी व कर्मचा-यांच्या सेवानिवृत्ती गौरव प्रित्यर्थ समारंभसाठी येणा-या सुमारे तीन लाख रुपयांच्या खर्चास, ‘ह’ प्रभागातील जलनिःसारण नलिकांची वार्षिक ठेकेदारी पध्दतीने साफसफाई करणे व चोकअप काढण्यासाठी येणा-या सुमारे 98 लाख 97 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.