निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्मार्ट सिटी अंतर्गत अर्बनस्ट्रीट डेव्हलपमेंट नुसार रस्ते विकसित करण्यासंदर्भात राष्ट्रवादीचे नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देवून मागणी केली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा स्मार्ट सिटी मध्ये समावेश झालेला आहे. त्या अंतर्गत शहरात विविध विकास कामे प्रगतीपथावर आहेत, त्यानुसार शहरातील मुख्य विकास आराखड्यातील रस्ते अर्बन स्ट्रीट डेव्हलपमेंट अंतर्गत विकसित करण्यात येत आहेत. त्याला अनुसरूण रहाटणी, पिपंळे सौदागर प्रभाग क्र.२८ मधील विकास आराखड्यातील ४५.०० मीटर रुंदीचा नाशिक फाटा ते वाकड पर्यंतचा बीआरटीएस रस्ता, मुख्य रस्त्यालगत असलेले सायकल ट्रॅक व फुटपाथ विविध विकास कामाच्यां खोदकामुळे खराब झाले आहेत. सदर रस्ते अर्बन स्ट्रीट डेव्हलपमेंट अंतर्गत विकासित करावी अशी मागणी नगरसेवक नाना काटे यांनी निवेदनाद्वारे आयुक्तानां केली आहे.
पिंपळे सौदागर मधील स्वराज गार्डन चौकापासून कोकणे चौक व कोकणे चौक ते साई चौक (जगताप डेअरी) पर्यंत फुटपाथ व सायकल ट्रॅकचा वापर नागरिक व रहिवाशी मोठ्या प्रमाणावर करतात. सदर भाग दाट लोकवस्तीचा आहे. त्यामुळे सदर ठिकाणचे फुटपाथ सायकल ट्रॅक विकसित करणे आवश्यक आहे अशी मागणी नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी आयुक्तांकडे केली आहे.