निर्भीडसत्ता न्यूज –
चिंचवड, संभाजीनगर येथील पवन शहा या खेळाडूची १९ वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघात निवड झाली आहे. त्याबद्दल भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते पवन शहा याचा सत्कार करण्यात आला.
आमदार जगताप यांच्या पिंपळेगुरवमधील संपर्क कार्यालयात हा कार्यक्रम झाला. यावेळी भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसेवक शत्रुघ्न काटे, सागर आंगोळकर आदी उपस्थित होते.
पवन शहा याची भारतीय संघात निवड झाल्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. शहरातील खेळाडूंसाठी योग्य वातावरण तयार करण्यात येईल. त्यातून क्रीडा क्षेत्रातील प्रत्येक प्रकारात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नेतृत्व करणारे खेळाडून घडविण्याचा प्रयत्न असेल, असे आमदार जगताप यांनी यावेळी सांगितले.