निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड महापालिका भवनासमोर मेट्रो कॉर्पोरेशनच्या वतीने नुकतेच काम सुरू करण्यात आले आहे. मोरवाडी चौक ते खराळवाडीपर्यंतचा सर्व्हिस रस्ता अरूंद झाला असून वाहतुक संथ होत आहे. त्यामुळे वाहनचालक वैतागले आहेत.
महापालिका समोर सर्व्हिस रस्त्यांवर लोखंडी बॅरीकेटस लावून कामास सुरूवात केली आहे. मोरवाडी चौकातील अहल्यदेवी पुतळ्यापासून ते पालिका बस थांब्याच्या अलिकडीपर्यंत बॅरिकेटस लावून काम सुरू करण्यात आले आहे. हा सुमारे 500 मीटरचा मार्ग अगोदर अरूंद असल्याने येथे केवळ एक बस जाईल इतकी जागा शिल्लक राहिल्याने वाहतुक संथ झाली आहे.
काही ठिकाणी रिक्षा व इतर वाहने थाटपणे थांबत असल्याने इतर वाहनांना अडथळा होत आहेत.