निर्भीडसत्ता -न्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौरपदी निवड झाल्यानतंर राहूल जाधव यांनी पुष्पगुच्छाऐवजी वह्या, पुस्तकांसारखे शालेय साहित्य देण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. त्यानुसार चिखलीतील एका सोसायटीच्या वतीने महापौरांची शैक्षणिक साहित्याने तुला करण्यात आली.
चिखलीतील जाधववाडी येथील वुडस् व्हीला सोसायटीच्या वतीने स्वातंत्र्यदिनी महापौर जाधव यांची शालेय साहित्याने तुला करण्यात आली. यावेळी आमदार महेश लांडगे, सोसायटीचे चेअरमन डॉ. प्रमोद कुबडे, सचिव अजित वाडकर, खजिनदार संदीप उमक, उपाध्यक्ष प्रशांत नायर, भाऊराव पांडे, अतुल बोराटे आदी उपस्थित होते.
महापौर यांना सदिच्छा देताना पुष्पगुच्छ न देता वह्या, पुस्तके असे शालेय उपयोगी साहित्य द्यावे, हे आवाहन केले होते. त्याला प्रतिसादन अनेकांनी शालेय साहित्य जमा केले आहे. हे शालेय साहित्य आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेमधील आदिवासी विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले असल्याचे महापौर जाधव यांनी सांगितले.