निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड महापालिकेने 72 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला. शहरभर देशभक्तीचे वारे वाहत होते. शहराला स्वतंत्र पोलीस आयुक्तालय मिळाल्याने पिंपरी-चिंचवडकरांसाठी स्वातंत्र्य दिन खास ठरला. निगडीतील भक्ती-शक्ती चौकात असलेला देशातील सर्वात मोठा तिरंगा फडकवण्यात आला. हजारो शहरवासियांनी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, उपमहापौर सचिन चिंचवडे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे, अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, इ प्रभाग अध्यक्षा भीमाबाई फुगे, नगरसदस्य राजेंद्र गावडे, राजू मिसाळ, अमित गावडे, केशव घोळवे, राजेंद्र लांडगे, शैलेश मोरे, नगरसदस्या अपर्णा डोके, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर, दिलीप गावडे आदी उपस्थित होते.