निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी स्वयंसेवी संस्था आणि सार्वजनिक गणेश मंडळांच्या अध्यक्षांची बैठक बुधवारी (दि.29) आयोजित केली आहे. ही बैठक चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृह येथे दुपारी तीन वाजता होणार आहे.
या बैठकीस गणेश मंडळ, स्वयंसेवी संस्था आणि पर्यावरणप्रेमींनी सहभागी होऊन पर्यावरण संवर्धनाबाबत सूचना द्याव्यात, असे आवाहन महापौर राहुल जाधव यांनी केली आहे.