निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी चिंचवड महापालिकेकडून विविध आवश्यक कामे करण्यासाठी गुरुवारी ( दि. 30) सायंकाळीच्या वेळेला शहरात होणारा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे, त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा पुरेशा साठा करुन काटकसरीने वापर करावा, असे आवाहन सहशहर अभियंता आयुबखान पठाण यांनी केले आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुध्दीकरण केंद्रातील पाणी पुरवठा विभागाची नियमित देखभाल दुरुस्तीची व काही तांत्रिक आवश्यक कामे करणे, तसेच विद्युत विभागातील रावेत पंपिंग स्टेशनमधील आणि जलशुध्दीकरण केंद्रातील आवश्यक कामे करण्यात येणार आहे. त्यामुळे पाणी वितरण व्यवस्थेतील दुरुस्तीचे कामे हाती घेतल्याने गुरुवारी ( दि.30) शहरातील पाणी पुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे.
महापालिकेकडून गुरुवारी (दि.30) सकाळचा पाणी पुरवठा करण्यात येईल, त्यानंतर दुरुस्तीच्या कामामुळे शहरातील सर्व भागाचा सायंकाळचा पाणी होणार नाही. दुरुस्तीच्या कामासाठी सर्व पाणी पुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवल्यामुळे शहरातील सर्व भागात शुक्रवारी (दि.31) सकाळचा पाणी पुरवठा अनियमित होणार आहे. त्यामुळे शहरातील सर्व नागरिकांना पाण्याचा पुरेशा साठा करुन ते काटकसरीने वापरुन पालिकेला सहकार्य करावे, असे पाणी पुरवठा विभागाने आवाहन केले आहे.