निर्भीड न्यूज –
पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी कॉंग्रेसचे युवा कार्यक्रर्ते सचिन नेटके यांची शहर कॉंग्रेसच्या सचिव पदावर नियुक्ती केली आहे. नुकतेच त्यांना चाफेकर चौकातील पक्षकार्यालयात नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
कॉंग्रेस सेवादलाचे शहराध्यक्ष संग्राम तावडे, मावळ युवा कॉंग्रेस अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, चिंचवड विधानसभा युवक अध्यक्ष मयुर जैस्वाल, संदिप जाधव, करण क्षिरसाठ आदी उपस्थित होते.
सचिन नेटके यांनी चिंचवड विधानसभा अनुसुचित जाती विभाग अध्यक्ष पदावर काम केले आहे.