निर्भीडसत्ता न्यूज –
चिंचवड येथील ज्ञांनवर्धिनी प्रतिष्ठानचे ज्ञांनवर्धिनी महाविद्यालय,येथे शिक्षक दिन उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाची सूत्रे हाती घेऊन विविध क्रीडा व इतर उपक्रम शिक्षक दिनानिमित्त आयोजित केले. विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवकांचा विद्यार्थ्यांनी वृक्ष रोप देऊन यथोचित सत्कार केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कविता प्रभुणे यांनी सर्व शिक्षक व विद्यार्थी यांचे मार्गदर्शन केले.
दरम्यान या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे आपले मनोगत व्यक्त केले व शिक्षकांच्या प्रति त्यांच्या भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष प्रा. राहुल बाराथे, कविता प्रभुणे, प्रा. अजित पतंगे, प्रा. रोहिणी सुतार, प्रा. अमित ठोसर, प्रा. अंजली पाटील उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजना मरगुरे, प्रास्तविक स्नेहा कोलगे व आभार सप्निल गोरुले यांनी केले.