निर्भीडसत्ता न्यूज –
बुलडाणा जिल्ह्यातील खामगावमध्ये बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. बापानेच आपल्या 9 वर्षीय मुलीवर बलात्कार केला आहे. खामगाव तालुक्यातील सुटाला खुर्द गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी नराधम बापाला पोलिसांनी अटक केली आहे. संदीप महाजन असे आरोपीचे नाव आहे.
पीडित मुलीची आई धुणीभांडी करते. नेहमीप्रमाणे त्या त्यांच्या कामाला गेल्या होत्या. सायंकाळी पीडित मुलगी शाळेतून घरी आली.पीडितेचे भाऊ बाहेर खेळत होते. मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून बापाने तिच्यावर बलात्कार केला. नंतर कोणाला काही सांगू नको, असेही बजावले. रात्री पीडितेची आई घरी आल्यनंतर दारूच्या नशेत आरोपीने तिलाही बेदम मारहाण केली. नंतर मुलांसह पत्नीला घराबाहेर काढले. रात्रभर आई, पीडिता आणि तिचे दोन भाऊ हे गावच्या मंदिराजवळ झोपले. सकाळी पीडित मुलीची तब्येत बिघडली. तेव्हा तिने आईला झालेला प्रकार सांगितला.
दरम्यान, तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी वडिल संदीप महाजनला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर आता या प्रकरणाचा पंचनामा सुरू आहे. पण या सगळ्या खळबळजनक प्रकारामुळे संपूर्ण परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.