निर्भीडसत्ता न्यूज –
हिंद केसरी गणपतराव आंदळकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. आंदळकर यांना सायंकाळी सातच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागल्याने पुण्यातील एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. परंतु, रुग्णालयामध्ये उपचारा दरम्यानच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालावली. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, सुन आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर सोमवार दि. 17 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता त्यांच्या मुळगावी पुनवत येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.