पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
राज्य किशोरी गट अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेमध्ये तसेच, अहमदनगर येथे राज्य किशोरी गटाच्या सराव शिबिरात तनिष्का बोरकर हिने उत्कृष्ट कामगिरी केली. 1ते 5 एप्रिल रोजी पाटणा, बिहार येथे 1 ते 5 एप्रिल या कालावधीत होणार्या राष्ट्रीय सबज्युनिअर कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात तिची निवड झाली आहे.
तनिष्का निगडी येथील ज्ञान प्रबोधिनी विद्यालयात दहावीत शिकत आहे. नियमित सरावामुळे ती कबड्डी स्पर्धेत यश मिळवित आहे. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका विद्या उदास, केंद्रप्रमुख मनोज देवळेकर यांनी तिचे अभिनंदन करीत तिला शुभेच्छा दिल्या. तिला विद्यालयाचे ज्येष्ठ मार्गदर्शक भगवान सोनवणे व स्वाती ढमाले यांनी मार्गदर्शन लाभले.