निर्भीडसत्ता न्यूज –
चिंचवड येथील बिजलीनगर येथे ४ वर्षाच्या मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ आज, सामाजिक कार्यकर्ते राजन माउली सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा द्यावी. या मागणीसाठी चिंचवड पोलीस स्टेशनवर मोर्चा काढण्यात आला होता.
यावेळी बिजलीनगर परिसरातील नागरिक,महिला वर्ग तसेच लैंगिक अत्याचार झालेल्या पिडीत मुलीचे कुटुंबीय तसेच पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, राष्ट्रवादीचे नेते नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, प्रवक्ते फजल शेख यांनी चिंचवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक खुळे यांच्याकडे आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली.