निर्भीडसत्ता न्यूज –
महापालिका पाणी पुरवठा अधिका-यांचा कित्येक दिवसापासून पाणी टंचाईचे कारण पुढे करुन चिंचवड विधानसभा मतदार संघात ना हरकत दाखला देणे बंद केले. परंतू, मागील दोन दिवसापासून पाण्याची परस्थिती बिकट असूनही अचानक बिल्डरांना एनआेसी देणे सुरु केले. त्यामुळे शिवसेना गटनेते राहूल कलाटे यांनी याबाबत आयुक्त श्रावण हर्डिकर, पाणी पुरवठा अतिरिक्त सहशहर अभियंता रामदास तांबे यांना जाब विचारला होता. मात्र, निर्धास्त असलेले अधिकारी बांधकाम एनआेसीची कसलीही माहिती देत नसल्याने आज (शनिवारी) सायंकाळी आठ वाजता तांबे यांच्या कार्यालयात ठिय्या मारुन बांधकाम एनआेसीची माहिती देत नाही, तोपर्यंत कार्यालयाबाहेर पडायचे नाही, असा इशारा देत त्यांना थांबवून ठेवले होते. दरम्यान, यावेळी पालिका आयुक्तही गटनेत्यांचा फोन उचलत नसल्याने दिसून आले.