निर्भीड न्यूज –
गजाननभाऊ चिंचवडे सोशल फाऊंडेशनचे ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदा आमटे, ठाण्याचे आमदार संजय केळकर आणि प्रा. नितीन बानगुडे पाटील यांच्या हस्ते चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात उद्घाटन करण्यात आले. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
फाऊंडेशनचे अध्यक्ष गजानन चिंचवडे, सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती नाना शिवले, शेखर चिंचवडे, व्यापार आघाडीचे अध्यक्ष राजेंद्र चिंचवडे, कैलास गावडे, हरीभाऊ चिंचवडे, पांडुरंग चिंचवडे, राजाभाऊ विनोदे, प्रकाश डोंगळे, गोपाळ बिरारी, सुनंदा काळे, विजय टाकमोघे, धर्मेंद्र आगरवाल, नरेंद्र बिकूनिया, हिरामण बोडके, कमलेश पवार, सुमित वानखेडे, सचिन खरमाळे, शुभम चिंचवडे, दिलीप भोसले, विजय कदम आदी उपस्थित होते.
यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक कार्यासाठी गजानन चिंचवडे यांना डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदा आमटे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. गजाननभाऊ चिंचवडे सोशल फाउंडेशनच्या वतीने डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पाला ५००१ रुपयांचा मदत निधी देण्यात आला.