निर्भीड न्यूज –
पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या अध्यक्षपदी शशिकांत उर्फ बबन झिंजुर्डे आणि कार्याध्यक्षपदी हनुमंत लांडगे यांची आवाजी मतदानाने निवड करण्यात आली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी (दि. 28 मे) आचार्य अत्रे सभागृहात संपन्न झाली.
कार्याध्यक्षपदावर शिवाजी येळवडें, मुकुंद वाखारे, रोहिणी गव्हाणकर, महासचिव चारुशिला जोशी, मुख्य प्रवक्ता मनोज माछरे, सहमुख्य प्रवक्ता रेखा गाडेकर, खजिनदार अंबर चिंचवडे, सहखजिनदार अविनाश ढमाले, मुख्य संघटक महाद्रंग वाघेरे, नितीन समविर, दिगबंर चिंचवडे, बाळासाहेब कापसे, दत्तात्रय ढगे, प्रभाकर तावडे, महादेव बोत्रे, सिमा सुकाळे, महेश आढाव, संपर्क प्रमुख मधुकर रणपिसे, नंदकुमार घुले, सुनिल विटकर, राणु ठोकळ, विशाल भुजबळ, उपाध्यक्ष दिपक गळीतकर, पांडुरंग म्हस्के, सरिता निगडे, दिलीप गुंजाळ, नथा मातेरे, भगवान मोरे, उत्तम गंगावणे, रमेश चोरगे, संजिव राक्षे, सुभाष लांढे, ज्ञानेश्वर शिंदे, बालाजी अय्यंगार, सुहास ताकवले, संजय कापसे, परशुराम कदम, सचिव गुरुराज गंगावणे, अनिल सुतार, मदन चिंचवडे, चंद्रकांत कांबळे, युवराज नेवाळे, विजय नलावडे, निलेश कांबळे, दत्तात्रय हाटकर, हेमंत पिंजण, अनिल लख्खन, उमेश बांदल, हनुमंत चाकणकर, संघटक राजाराम चिंचवडे, अतुल आचार्य, यशवंत देसाई, विजय मुंडे, गोतम भालेराव, प्रितम बाविस्कर, किशोर आठवाल, राकेश चव्हाण, वैभाव देवकर, रमेश लोंढे, राजश्री गायकवाड यांची निवड सर्वांनुमते निवड करण्यात आली.
कार्यकारिणी सदस्य पदावर 67 कर्मचा-यांची निवड करण्यात आली. नवनियुक्त पदाधिका-यांच्या महापौर शकुंतला धराडे, आयुक्त दिनेश वाघमारे, आमदार लक्ष्मण जगताप, ॲड. गौतम चाबुकस्वार, महेश लांडगे, स्थायी समिती अध्यक्ष हिरानंद आसवाणी आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.