निर्भीड न्यूज –
पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समितीचे सदस्य नगरसेवक कैलास थोपटे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. थोपटे यांच्या वाढदिवसानिमित्त कुणाल थोपटे स्पोर्ट्स फौंडेशनच्या वतीने छत्रपती ग्रुप व सिद्धिविनायक प्रतिष्ठानला हॉलीबॉलचे ग्राउंड बनवून देण्यात आले.
नगरसेवक थोपटे यांच्या कार्यकर्त्यांनी अभिनव संकल्पना राबवून वेगऴ्या पद्धतीने वाढदिवसाचे अभीष्टचिंतन केले. सध्या महाराष्ट्र प्रचंड दुष्काळ पडला आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट आहे. नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. अशा परिस्थितीत थाटामाटात वाढदिवस साजरा न करता सामाजिक बांधिलकी जोपासून पुष्पगुच्छ आणि भेटवस्तूंवर खर्च न करता ती रक्कम दुष्काळग्रस्त साह्यता निधीमध्ये जमा करावी असे आवाहन थोपटे यांनी कार्यकर्त्याना केले.
युवा नेते कुणाल थोपटे, प्रदीप चौधरी, निलेश कट्टे, प्रमोद कुंजीर, दिनेश देशमुख, रणजीत पेटकर, योगेश कुंजीर, निलेश कुंजीर, संजय महाडिक, सचिन गरकळ, सार्थक बलकवडे, सागर कदम, अभिजित मांजरे, सागर मोरे, अक्षय दिवेकर, दीपक कानगुडे, विजय भातकुडे, दीपक कारभारे, प्रकाश चौधरी, छत्रपती ग्रुप व सिद्धिविनायक प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.
छत्रपती ग्रुप व सिद्धिविनायक प्रतिष्ठानच्या वतीने केक कापून नगरसेवक कैलास थोपटे यांना शुभेच्छा देण्यात आल्या.