निर्भीडसत्ता न्यूज –
एशियन शितो-रियो स्पोर्ट्स कराटे डू असोसिएशनच्या वतिने नुकत्याच पुणे येथे एकदिवसीय राज्यस्तरीय कराटे स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यामधे पुणे संघाने प्रथम व मुंबई,औरंगाबाद संघाने अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकवला.
खराडी येथील राजाराम भिकू पठारे संकुलामधे या कराटे स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यामधे मुंबई, पुणे, नागपूर, वर्धा, धुळे, जालना, परभणी, अहमदनगर, नंदूरबार, औरंगाबाद, सोलापूर, पंढरपूर, कोल्हापूर येथील स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा कातास व कुमीते या दोन प्रकारात खेळवण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन आमदार बापूसाहेब पठारे,शिहान परमजित सिंग सेक्रेटरी कराटे असोसिएशन ऑफ इंडिया,महाराष्ट राज्य यांच्या हस्ते पार पडले.
उद्घाटन प्रसंगी आमदार पठारे यांनी स्वसंरक्षण करण्यासाठी कराटे ही उत्तम कला असून प्रत्येकाने याचे प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे, महिला,मुलींवर वाढते अत्याच्यार पहाता प्रत्येक शाळांमधे मुलींना स्वरक्षणासाठी कराटे या कलेचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले. यावेळी सतिश शिंदे,शिहान राजु गोसावी,मनजित शेलार,शिला कांबळे,सागर भालेराव आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
स्पर्धेमधे हिंजवडी मधील नितिन काकडे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांनी कराटेच्या कातास व कुमीते यादोन्ही प्रकारात घवघवीत यश मिळवत पुणे संघाला प्रथम क्रमांक मिळवून देण्यात मोलाची साथ दिली. याराज्यस्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन एशियन शितो-रियो स्पोर्ट्स कराटे डू चे अध्यक्ष संजय गव्हाळे व सचिव कृष्णा अडागळे यांच्या वतीने, नेहरू युवा केंद्राच्या सहकार्याने करण्यात आले होते. स्पर्धेसाठी पंच म्हणून विर चौहान, पाटील, राजेश माने, यांनी काम पाहिले. विजेत्या संघाना खराडीचे नगरसेवक रविंद्र पठारे, सिहान राजू गोसावी, असोसिएशनचे खजिनदार सागर भालेराव यांच्या हस्ते सुवर्ण, रौप्य, कास्य पदक बक्षीसांचे वितरण करण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी धनंजय यादव, शुभम, ज्ञानेश्वर, स्वाती मॅडम, शिवा चिंचलपूडी आदिंनी परिश्रम घेतले. सर्व यशस्वी खेळाडूंना सेन्साय नितीन काकडे आणि शिहाण राजू गोसावी यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धेतील उदघाटन व बक्षीस वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर भालेराव यांनी केले. तर आभार आयोजक संजय गव्हाळे यांनी मानले.
पुणे संघाला प्रथम क्रमांक मिळऊन देण्यात हिंजवडीतील स्पर्धकांची मोलाची कामगिरी
काता प्रकार
सुवर्णपदक – तेजस भालेराव, रौप्य पदक – मोक्शाश्री वेमुरी, तौफिक खान, साहिल शेख, अजय टकले, प्रविण टकले, विजय शिंदे, कांस्यपदक – श्रवण काकडे, अक्रम शेख, नभिखान पठाण,वसिम शेख,अभिजीत जगताप.
कुमीते प्रकार
कांस्यपदक – श्रवण काकडे, स्वराज साखरे, साहिल शेख, प्रविण टकले,अभिजीत जगताप,नभिखान पठाण.रौप्यपदक – मोक्शाश्री वेमुरी, तौफीक खान, अजय टकले, संतोष वाघमारे.