निर्भीड न्यूज –
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पिंपळे सौदागर येथील गोविंद यशदा चौकातील रस्त्याच्या बाजुने नगरसेवक शत्रुघ्न काटे व जेष्ठ नागरिक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी हरित पिंपळे सौदागारचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी एकतरी लावले पाहिजे व जगवले पाहिजे असे मत शत्रुघ्न काटे यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त व्यक्त केले.
सामाजिक कार्यकर्ते जयनाथ काटे, उद्यान विभाग परिवेक्षक सी.सी. मोरे, परिसरातील ज्येष्ठ नागरिक, पिंपळे सौदागार येथील सोसायटी मधील सभासद आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
या वेळी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना नगरसेवक शत्रुघ्न काटे म्हणाले कि, ‘हरित पिंपळे सौदागर’ चे स्वप्न पुर्ण करण्यासाठी सर्व प्रथम परिसरामध्ये वृक्ष लागवड करने गरजेचे आहे. येत्या काही दिवसातच पावसाळा सुरु होण्याच्या मार्गावर आहे आणि वृक्षारोपणसाठी हा काळ सर्वोत्तम असतो व यासाठी आपन सर्वानी वृक्षारोपण करुण फायदा घेतला पाहिजे असे मत काटे यांनी व्यक्त केले. वृक्षारोपण करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढे येऊन प्रत्येकाने किमान दोन झाडे आपल्या अवतीभवती परिसरात लावली पाहिजे जेणे करून “हरित पिंपळे सौदागर” च्या स्वप्नपूर्ती च्या दिशेने आपला प्रवास सहज पुर्ण होईल आणि यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याबाबत बापु काटे यांनी शब्द दिले .
या वृक्षारोपनाचा फायदा काही काळानंतर वाटसरूणा तर होइलच तसेच परिसरातील सौंदर्यात देखील भर पडेल. पावसाचे होणारे कमी प्रमाण लक्षात घेता येणारा काळ हा चिंताजनक आहे यासाठी आपण आज वृक्षारोपण करणे गरजेचे आहे नाहीतर भविष्यात भावी पिढीसाठी जीवन जगणे आव्हानात्मक होईल. वाढती वाहतूक आणि त्यामधून होणारे प्रदुषण यापासून आपले संरक्षण या हरित वृक्षामुळेच होते. येत्या पुढील काही दिवसात प्रभागामध्ये जास्तीत जास्त ठिकाणी वृक्षारोपण करण्याचे ध्येय नगरसेवक काटे यांनी घेतले आहे.
पूर्वा रेसिडेन्सी सोसायटी आणि साई व्हिजन साई अंबीयंन्स सोसायटीमध्ये हि वृक्षारोपण करण्यात आले.