निर्भीड न्यूज –
– कै. गबाजी थोपटे प्रतिष्टानतर्फे शिबिराचे आयोजन
गेल्या कित्येक दशकांपासून भारताची ओळख असलेल्या योग साधना आता आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा होणार आहे. संयुक्त राष्ट्रानं 21 जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून घोषित केला आहे. रहाटणीतील कै. गबाजी थोपटे प्रतिष्ठानतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सोमवार दि. 20 जून व मंगळवार दि. 21 जून रोजी मोफत योग प्राणायम शिबिराचे आयोजन थोपटे लॉन्स येथे करण्यात आले आहे.
कै. गबाजी थोपटे प्रतिष्ठान व पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समितीचे सदस्य नगरसेवक कैलास थोपटे आणि युवा नेते कुणाल थोपटे यांनी या योग दिनाचे आयोजन केले आहे.
शिबिरामध्ये मनाची एकाग्रता, आसन, सूर्यनमस्कार, तणावमुक्त जीवन, मनशांती, ध्यान आणि प्राणायाम घेतले जाणार आहेत. योग तज्ञांकडून या शिबिरात मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच या शिबिरामध्ये भाग घेणा-याला याचा फायदा होणार आहे.
दोन दिवस होणा-या शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नगरसेवक कैलास थोपटे आणि युवा नेते कुणाल थोपटे यांनी केले आहे.