निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक विभागास 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2019 या आर्थिक वर्षात तब्बल 74 कोटी 17 लाख 99 हजार 929 रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. पालिकेने 50 कोटींचे उद्दीष्टे ठरविले होत. त्यापेक्षा अधिक म्हणजे 24 कोटी 18 लाख अधिक उत्पन्न पालिकेस मिळाले आहे.
पालिकेच्या अग्निशामक विभागाकडून 5 मजल्याच्या पुढील नव्या इमारतीमध्ये अग्निशामक यंत्रणा उभारण्यासाठी ‘ना हकरत प्रमाणपत्र’ घेणे सक्तीचे आहे. अग्निशामक यंत्रणेची पाहणी करून पालिकेच्या अग्निशामक विभागातर्फे ‘ना हकरत प्रमाणपत्र’ दिले जाते. त्यासाठी पालिका शुल्क आकारते. या प्रमाणपत्रानंतर बांधकाम व्यावसायिकास गाळे व सदनिकांची विक्री करता येतात. तसेच, हद्दीबाहेरील आग विझविणे, आग वर्दी प्रमाणपत्र तसेच, हॉटेल, रॉकेल विक्रेते, मल्टिप्लेक्स, शॉपींग मॉल आदींनाही अग्निशामक दलाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ सक्तीचे आहे.
शहरात मोठ्या संख्येने इमारती वाढल्याने अग्निशामक विभागाचे ‘ना हकरत प्रमाणपत्र’ घेण्याची संख्याही वाढली आहे. एकूण उत्पन्नात हे प्रमाण 80 ते 85 टक्के आहे. त्यामुळे यंदा 74 कोटी 18 लाखांचे उत्पन्न पालिकेस मिळाले आहे. वर्षभरासाठी पालिकेचे 50 कोटींचे उद्दीष्टे होते. त्यापेक्षा अधिक 24 कोटी 18 लाख रूपये वर्षभरात प्राप्त झाले आहेत. तसेच, हे उत्पन्न मागील दहा वर्षांतील सर्वांधिक आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली.