- 16 ‘हाय रिस्क झोन’वर कडक निर्बंध
- पुढील आदेश येईपर्यंत निर्बंध कायम : महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची माहिती
पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी- चिंचवड शहरात कोरोनाचा मोठ्या प्रमाणता प्रसार होत नसल्याने संपूर्ण शहर कंन्टेनमेंट झोनचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. मात्र, शहरातील सर्व मुख्य मार्ग व सीमा पूर्वीप्रमाणे बंदच राहणार आहेत. शहरात 16 कंन्टेनमेंट झोनमध्ये (हाय रिस्क) संचारबंदी व कडक प्रतिबंध कायम ठेवण्यात आले आहेत, तर, उर्वरित भागात काही निर्बंध शिथील करण्यात आले आहेत, असे पिंपरी-चिंचवड महापलिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोमवारी (दि.27) आपल्या आदेशात म्हटले आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आयुक्तांनी रविवारी (दि. 19) मध्यरात्रीपासून ते सोमवार (दि.27) पर्यंत संपूर्ण शहर सील करण्याचा निर्णय घेतला होता. तो निर्णय आयुक्तांनी पुढील आदेश येईपर्यंत कायम ठेवला आहे. वरील आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर कडक कारवाईचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
हे आहेत 16 कंन्टेनमेंट झोन
खराळवाडी, भोसरीतील पीएमटी चौक, गुरूदत्त कॉलनी, शास्त्री चौक व आदिनाथनगर, कासारवाडीतील रामराज्य प्लॅनेट, दापोडीतील गणेशनगर, आकुर्डीतील संभाजीनगर, दिघीतील रोडे रूग्णालय व विजयनगर, चर्होलीतील तनिष्क ऑर्किड, पिंपळे गुरवमधील कृष्णराज कॉलनी, नेहरूनगर बस डेपो, वाकडमधील कावेरीनगर पोलिस लाइन, तळवडेतील रूपीनगर, मोशीतील फातिमा मशिद, गंधर्वनगरी हे 16 कंन्टेनमेंट झोन सील करण्यात आले आहेत. तेथे या पुढेही कडक निर्बंध राहणार आहेत. कंन्टेनमेंट झोनमधील दुध, भाजीपाला, मटन, चिकन व किराणा दुकाने सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत उघडी राहतील.
शहराती उर्वरित भागात भाजीपाला, दूध, चिकन विक्रीची वेळ दोन तासांनी वाढविली
सोळा कंन्टेनमेंट झोन वगळून शहरातील इतर ठिकाणी दूध, फळ, भाजीपाला, मटण, चिकन, किराणा विक्री दुकाने सकाळी 10 ते दुपारी 2 ऐवजी दुपारी 4 पर्यंत खुली राहणार आहेत. फळ व भाजीपाला व्रिकी केवळ पालिकेच्या तात्पुरत्या भाजी विक्री केंद्रावर सुरू राहिल. इतर ठिकाणी फळ व भाजीपाला विक्रीस बंदी आहे. औषध, जीवनावश्यक वस्तू, अन्नपदार्थ घरपोच वाटपासाठी सकाळी 8 ते रात्री 10 ही वेळ राहणार आहे. सर्व रुग्णालय, दवाखाने व औषध दुकाने दिवसभर खुली राहतील. तर, बँका सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत खुली राहतील.