पिंपरी | निर्भीड सत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधी समिती, महिला व बालकल्याण समिती, शहर सुधारणा समिती, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक आणि शिक्षण समितीत नवीन सदस्यांची मंगळवारी (दि. 13) महापालिका सर्वसाधारण सभेत निवड करण्यात आली. सत्ताधारी भाजपचे 5, राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 आणि शिवसेनेच्या 1 सदस्याची प्रत्येक समिती निवड करण्यात आली.
सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर उषा ढोरे होत्या. या सभेत विषय समितीच्या नवीन सदस्यांची निवड करण्यात आली.
निवड झालेले नगरसेवक असे आहे.
विधी समितीमध्ये स्वीनल म्हेत्रे, वसंत बोराटे, संगीता भोंडवे, सुजाता पालांडे, सीमा चौघुले (भाजप), अनुराधा गोफणे, सुलक्षणा धर, पौर्णिमा सोनवणे (राष्ट्रवादी काँग्रेस), अमित गावडे (शिवसेना) यांची निवड झाली.
महिला व बालकल्याण समितीमध्ये योगिता नागरगोजे, सविता खुळे, चंदा लोखंडे, माधवी राजापूरे, निर्मला गायकवाड (भाजप), मंगला कदम, गीता मंचरकर, निकिता कदम (राष्ट्रवादी काँग्रेस), अश्विनी चिंचवडे (शिवसेना) यांची निवड झाली.
शहर सुधारणा समितीमध्ये साधना मळेकर, सोनाली गव्हाणे, अनुराधा गोरखे, सुनीता तापकीर, शारदा सोनवणे (भाजप), वैशाली घोडेकर, संगीता ताम्हाणे, प्रज्ञा खानोलकर (राष्ट्रवादी काँग्रेस), सचिन भोसले (शिवसेना) यांची निवड झाली.
क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीमध्ये अश्विनी जाधव, केशव घोळवे, उत्तम केंदळे, शैलेश मोरे, बाळासाहेब ओव्हाळ (भाजप), डब्बू आसवानी, अपर्णा डोके, प्रवीण भालेकर (राष्ट्रवादी काँग्रेस) व रेखा दर्शले (शिवसेना) यांची निवड झाली.
शिक्षण समितीमध्ये सारिका सस्ते, प्रियंका बारसे, मनीषा पवार, माया बारणे, तुषार कामठे (भाजप), मोरेश्वर भोंडवे, स्वाती काटे, भाऊसाहेब भोईर (राष्ट्रवादी काँग्रेस) व अश्विनी वाघमारे (शिवसेना) यांची निवड झाली.