पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेची फेब्रुवारी 2022 ची पंचवार्षिक निवडणूक तीन सदस्यीय प्रभागानुसार होणार असल्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे राजकीय नेतेमंडळी, विद्यमान नगरसेवक व इच्छुकांचा संभ्रम दूर झाला आहे. त्या दृष्टीने मोर्चबांधणीस सुरूवात करण्यात आली आहे. तब्बल 20 वर्षांनंतर तीन सदस्यीय प्रभागानुसार निवडणुका होत आहेत.
राज्य मंत्रिमंडळाच्या तीन सदस्यीय प्रभागरचनेच्या निर्णयावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मोहर उठविली आहे. त्यामुळे महापालिकेची निवडणुक तीन सदस्यीय प्रभागानुसार होणार हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे दोन सदस्यीय प्रभागाबाबत सुरू असलेल्या चर्चेला विराम मिळाला आहे. निवडणुका तीन सदस्यीय पद्धतीनेच होणार असल्याने निर्माण झालेला संभ्रम दूर झाला आहे.