पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
राष्ट्रीय वन्यजीव महोत्सव निमित्त इन्डो अथलेटिक्स सोसायटीच्या वतीने घोरवडेश्वर बाईक अँड हाईक हा उपक्रम रविवारी घेण्यात आला, पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील 500 हून आधीक जणांनी सहभाग घेतला. संपूर्ण भारतामध्ये आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रामध्ये असणारी अग्रगण्य संस्था इन्डो अथलेटिक्स सोसायटी यांनी रविवारी दिनांक 3 ऑक्टोबर रोजी हा उपक्रम राबवण्यात आला. सदर स्पर्धेचे यंदा सहावे वर्ष होते. सर्व 500 सायकलस्वार सकाळी सात वाजता मुकाई चौक रावेत येथून झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली.
महावितरण बोर्डचे महेंद्र दिवाकर, स्वानंदी फाऊंडेशनचे शंकर उनेचा, आयएएसचे गजानन खैरे, अजित पाटील, गणेश भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आला. या उपक्रमांमध्ये अकरा किलोमीटर सायकलिंग आणि चार किलोमीटर घोराडेश्वर येथील डोंगरावर हायकिंग घेण्यात येते. याप्रसंगी गहुंजे ग्रामपंचायतीचे सरपंच लखन भाऊ बोडके, सुमित भाऊ बोडके यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. पुणे, पिंपरी-चिंचवड अशा विविध ठिकाणाहून सायकल राईड मध्ये भाग घेतला. आम्ही हा उपक्रम गेली सहा वर्षे करत आहोत याला दर वर्षी उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे, असे इंडो अथलेटिक्स सोसायटीचे संस्थापक सदस्य अजित पाटील यांच्यातर्फे सांगण्यात आले.
वनविभागातर्फे घोराडेश्वर येथे वृक्षारोपण करण्यात आले आणि यावर्षी आय ए एस तर्फे वन्य महोत्सव साजरा करण्यात आल्याबद्दल वन विभागाचे अधिकारी नानासाहेब लडकत यांच्यातर्फे इंडो अथलेतिक सोसायटी चे आभार व्यक्त करण्यात आले. अशा उपक्रमांना आमचा दरवर्षी पाठिंबा राहील असेदेखील वन विभाग तर्फे सांगण्यात आले. सर्वांनी शहरातील वेगवेगळ्या टेकड्यांच्या इथे स्वयंचलित वाहन आपेक्षा सायकल घेऊन जावे आणि नंतर व्यायाम करण्याचा आनंद लुटावा असे संस्थापक सदस्य गणेश भुजबळ यांच्या तर्फे सांगण्यात आले.घोरवडेश्वर बाईक अँड हाईक नियोजनामध्ये इंडो अथलेटिक्स सोसायटीचे सुशील मोरे, माधुरी पाचपांडे, श्रीकांत चौधरी, गिरीराज उमरीकर, अमित पवार, अविनाश चौगुले, रवी पाटील, प्रमोद चिंचवडे, सुशांत सेनापती, गोविंद घाटकर, सोनल वामन, अजित गोरे आदींनी मोलाचे सहकार्य केले.