पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
कोरोना संक्रमणाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व धर्मीय धार्मिक स्थळे व प्रार्थनास्थळे घटस्थापनेच्या मुहूर्तावर गुरुवार (दि.7) पासून भाविकांसाठी खुली केली जाणार आहेत. दर्शन घेताना भाविकांनी कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असा सूचना महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी केल्या आहेत.
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने घटस्थापनेच्या मुहूर्तावर गुरुवारपासून राज्यातील मंदिरे उघडण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार राज्यातील सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडली जाणार आहेत. त्यासाठीची नियमावली महापालिका आयुक्त पाटील यांनी आज जाहीर केले.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थनास्थळे गुरुवारपासून व्यवस्थापन, ट्रस्ट, ऑथॉरिटीने ठरवून दिलेल्या वेळेनुसार सुरु राहतील. धार्मिक स्थळ व प्रार्थना स्थळी नागरिकांनी मास्कचा वापर, थर्मल स्क्रिनिंग, हॅण्ड सॅनिटायझर, हॅण्डवॉशचा वापर करावा. तसेच सुरक्षित अंतराच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करावे, असे आयुक्त राजेश पाटील यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.