पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
माता देवी दुर्गेचा जागर केला जाणार्या नवरात्र उत्सव गुरूवार (दि.7) पासून सुरू होत आहे. कोरोना संक्रमणामुळे उत्सवात दांडीया व गरबा खेळण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र, रावन दहन कार्यक्रमास परवानगी देण्यात आली आहे. तसे आदेश पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी मंगळवारी (दि.5) जाहीर केले आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक मंडळांना नवरात्र उत्सवासाठी महापालिकेची पुर्वपरवानगी घ्यावी लागणार आहे. देवीची मूर्ती मंडळांसाठी 4 फूट, घरगुती 2 फूट असावी. शक्यतो मूर्ती धातू किंवा संगमरवर असावी. शाडूची किंवा पर्यावरणपूरक मूर्ती असल्यास तिचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास कृत्रिम हौदात विसर्जन करावे.
उत्सवात मंडळांनी गरबा, दांडिया व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजनास बंदी आहे.त्याऐवजी आरोग्य व रक्तदान शिबिरोचे आयोजन करावे. कोरोना व स्वच्छताविषयक जनजागृती करावी. भाविकांसाठी ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करावी. तसेच, प्रत्यक्ष दर्शनासाठी येणा-या भाविकांबाबत कोरोनाविषय नियमांचे पालन करावे. रावनदहनाचा कार्यक्रम सर्व नियम पाळून करावा. प्रेक्षक बोलावू नये. सोशल मीडियावर लाईव्ह प्रेक्षपण करावे, असे निर्देश आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत.