पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी तीन सदस्यीय प्रभागरचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे आदेश पिंपरी-चिंचवड महापालिकेस मंगळवारी (दि.5) मिळाले. त्यानुसार महापालिकेच्या वतीने काम सुरू केले जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळात तीन सदस्यीय प्रभागरचनेच्या निर्णय घेण्यात आला. त्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी 30 सप्टेंबरला मोहर उठविली. त्यामुळे राज्य निवडणुक आयोगाने मंगळवारी (दि.5) पिंपरी-चिंचवड महापालिकेस तसा आदेश दिला आहे.
तीन सदस्यीय प्रभागरचनेनुसार कच्चा आराखडा तयार करण्याचे काम मंगळवारपासून सुरू करावे, असे त्या आदेशात म्हटले आहे. एक सदस्यीय वॉर्डरचनेचा 25 ऑगस्टला दिलेल्या आदेश रद्द केल्याचे नमूद केले आहे. तीन सदस्यीय प्रभागरचनेमुळे पिंपरी-चिंचवड शहरात एकूण 43 प्रभाग निर्माण होणार आहेत. त्यात एकूण 42 प्रभाग हे 3 सदस्यीय असतील तर, एक प्रभाग 2 सदस्यीय असणार आहे.