पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
महापालिकेच्या मोरवाडी औद्योगिक प्रशिक्षण केंद्रामध्ये बुधवारी (दि.२०) सकाळी दहा वाजता रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. संबंधितांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
महापालिकेच्या वतीने महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित विचार प्रबोधन पर्वाअंतर्गंत या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पालिका आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यानंतर बेरोजगार युवक-युवतींसाठी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या सहकार्याने हा रोजगार मेळावा होणार आहे. या माध्यमातून बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.